⁠ 
सोमवार, मे 27, 2024

देशाच्या योग्य नेतृत्वासाठी मतदान करण्याचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भाजपा जळगाव पूर्व वैद्यकीय आघाडी बैठकीत नियुक्तीपत्र वितरित

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२४ । भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज जी एम फाउंडेशन येथे पार पडली असून देशाच्या योग्य नेतृत्वासाठी मतदान करण्यासाठी आवाहन करा करावे असे सांगण्यात आले.

या प्रसंगी भाजपा जळगाव महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जळगाव जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अमोल जावळे, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील, डॉ राधेश्याम चौधरी, डॉ धर्मेंद्र पाटील, डॉ प्रशांत भोंडे, डॉ ठाकुर यांच्या सह वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचेही यावेळी वाटप करण्यात आले तसेच डॉक्टरांना देव संबोधले जाते आपण त्या भूमिकेतून देशाचे योग्य नेतृत्व घडवण्यासाठी जनतेला मतदान करा असे आवाहन करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.