गुरूवार, सप्टेंबर 21, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ सप्टेंबर २०२३ | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जळगाव शहर जिल्हा अध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची नियुक्ती केली आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन गट पडले आहेत. राज्यात दोन्ही गटाकडून नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. अजित पवार गटाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी जळगाव शहर जिल्हा अध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची नियुक्ती केली आहे. तटकरे यांनी पाटील यांना नियुक्ती पत्र सोपविले.

याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील, जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.