जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । रामलल्लाच्या दर्शनासाठी पुण्याहून रेल्वे विभागाने ३ व ७ मे रोजी विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेला जळगाव, भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा आहे.
अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे ते अयोध्या दरम्यान अतिरिक्त ४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-अयोध्या रेल्वे (क्र ०१४५५) पुण्याहून ३ मे व आणि ७ मे रोजी रात्री ७.३० वा. सुटेल, दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१८ ला जळगाव तर ५.५० वाजता भुसावळला थांबेल. तिसऱ्या दिवशी अयोध्या येथे सकाळी ८.५० वाजता पोहोचणार आहे. परतीसाठी ही गाडी (क्र. ०१४५६) अयोध्याहून ५ मे आणि ९ मे रोजी दुपारी ४ वाजता निघेल. ती दुसऱ्या दिवशी भुसावळला सायंकाळी ५.१० आणि जळगावला ५.३५ वाजता पोहोचेल. तर पुण्याला तिसऱ्या दिवशी दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल
गाडीला १६ स्लीपर, पाच एसी आणि दोन जनरल कोच
गाडीला १६ स्लीपर कोच, दोन एसी-३ टायर तर २ जनरल कोच आहेत. स्लीपरसाठी ६७५ रुपये, एसीसाठी १७७५ तर जनरलसाठी ३१५ रुपये मोजावे लागणार आहे. ऑनलाइन आरक्षण उपलब्ध आहे. गाडीला चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना, झाशी, ओराई, कानपूर आणि लखनौला थांबा आहे.