जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील कर्जोद येथील मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय या संस्थेतर्फे शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्या मान्यवरांना ‘मौलाना अबुल कलाम आजाद आदर्श सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मौलाना अबुल कलाम आजाद राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त “मौलाना अबुल कलाम आजाद आदर्श सन्मान” पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे १० वे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी शिक्षक, साहित्यिक, कवी, पोलीस कर्मचारी आदींनी आपल्या कार्याचा प्रस्ताव दि. २५ ऑक्टोबरपर्यत पाठवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्मृतीचिंन्ह, मानपत्र, शाल,पेन असे या पुरस्काराचे स्वरुप असे आहे. रावेर, यावल तालुक्याचे आमदार व जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव एका प्रतीत व दोन रंगीत छायाचित्रासह मौलाना अबुल कलम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद, ता. रावेर, जि. जळगाव या पत्त्यावर पाठवावा व अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष शकील अब्दुल शेख ९८२३३३६४१७, आशिष पाठक ८६६८८२४६७२, हाजी सरफराज शेख ८६६८९७०६४४, उस्मान पटेल (धरणगाव) ८३९०६२१४११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.