⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | १६ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन! कोणी आणि का केलं ?

१६ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन! कोणी आणि का केलं ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२४ । बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाने आज एकत्रित बैठक घेऊन पुढील शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रपरिषेदेत माहिती दिली.

बांगलादेश येथे अनेक हिंदूंवर अत्याचार होत असल्याबाबतचे व्हिडीओ प्रसारित होत असल्याची माहिती देऊन जनार्दन हरी महाराज पुढे म्हणाले की, या प्रकरणी एक माणूस म्हणून आपण जळगाव जिल्हा हा दि. १६ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळणार आहोत. याबाबत आम्ही आवाहन करीत आहोत. तसेच, केंद्र सरकारने बांगलादेश येथील हिंदूंना संरक्षण देण्याबाबत भूमिका जाहीर करावी. याबाबत केंद्र सरकारने मानवाधिकार संघटनेने भूमिका मांडावी.

तसेच, वक्फ बोर्डाविषयी केंद्र सरकार कायदा आणत आहे. याबाबत आम्ही हिंदू समाजातर्फे आभारी आहे. कडकडीत बंद पळताना जिल्ह्यातील वातावरण खराब होणार नाही, चुकीचे फलक लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कार्यकर्त्यांना जनार्दन हरी महाराज यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला
महानुभाव शास्त्रीजी, शाम चैतन्य महाराज, अनंत प्रकाश, कोठारीजी, ललित चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.