शेतकऱ्यांना तुर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन; इतका मिळतोय हमीभाव? जळगावात 16 खरेदी केंद्र कार्यरत

फेब्रुवारी 10, 2025 6:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२५ । केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत हंगाम २०२४-२५ तुर खरेदी करीता जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव असे एकूण १६ खरेदी केंद्र कार्यरत आहे.

tur jpg webp

शेतकऱ्यांना दि. २४ जानेवारीपासून पुढे ३० दिवसापर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २०२४-२५ करिता तुर हमीभावाची किंमत ७५५०/- इतकी आहे. तरी शेतकरी बंधुंनी तुर नोंदणीचा लाभ घेवून ऑनलाईन नोंदणी करीता, आधारकार्ड, बैंक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ. कागदपत्रे घेवून खरेदी केंद्रांवर तुर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक. मंत्री संजय सावकारे, उपाध्याक्ष रोहित निकम, संचालक संजय मुरलीधर पवार तसेच एस.एस.मेने (प्र. जिल्हा पणन अधिकारी, जळगांव) यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now