जळगाव जिल्हा

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन ; ‘ही’ आहे शेवटची तारीख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २७ ऑगस्ट २०२१ | साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के गुण प्राप्त झाले असतील.

अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुणक्रमाकांनुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.

यासाठी 15 सप्टेंबर, 2021 च्या आत संपूर्ण कागदपत्रांसह मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी जिल्हा कार्यालयात संर्पक करावा, उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. असे ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
अर्जासोबत मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहिती 0257-2263294 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असेही जिल्हा व्यवस्थापक श्री. कसबे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button