---Advertisement---
वाणिज्य नोकरी संधी राष्ट्रीय

घोषणा : तरुणांसाठी ६० लाख नव्या नोकऱ्या, स्टार्ट अपसाठी आर्थिक मदत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । देशाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन Union Budget 2022 सादर करत आहेत. तरुणांसाठीही यंदा केंद्राने मोठी घोषणा केली असून देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच स्टार्टअपसाठी नाबार्डच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

jobs 1 jpg webp

२०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर ९.२७ टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इतक नाही तर पुढील पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३० लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं. 

---Advertisement---

स्टार्टअपकडे तरुणांचा कल वाढत असून नवनवीन संकल्पना घेऊन तरुण, युवा पुढे येत आहेत. स्टार्टअपला प्राधान्य देण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करण्यात येईल असे देखील निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---