महाराष्ट्रराजकारण

शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करा : एकनाथ शिंदे यांनी दिलं आव्हान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । शिवसेनेतून बंडखोरी केलेले व स्वतः सोबत तब्बल५० आमदार घेऊन गुहाटी येथे ठाण मांडून बसलेले, शिवसेनेचे कद्दावर नेते एकनाथ शिंदे आज कित्येक दिवसानंतर प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी आमच्या सोबत असलेले कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत त्यांची नावे जाहीर करा असा थेट आव्हान शिवसेनेला दिला आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार यांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे सांगावी. असे थेट आव्हान यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमची जी काही भूमिका असेल ती तुम्हाला आमचे प्रवक्ते दीपक केसरकर वेळोवेळी सांगत रहातील. मात्र आम्ही हिंदुत्वाशी तडजोड करू शकणार नाही. बाळासाहेबांचा विचार आम्ही दूर करू शकत नाही. शिवसेना हिंदुत्वासाठी जन्म घेतला आहे. आणि हिंदुत्वाशी आम्ही तडजोड करणार नाही. असे यावेळी एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला वेग आला आहे. एकीकडे कोणत्याही क्षणी भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताची चाचणी करू इच्छिते. तर दुसरीकडे या चिमण्यांनो परत फिरा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार यांना पत्र लिहिलं आहे. तर आज एकनाथ शिंदे यांनी कित्येक दिवस नंतर पत्रकारांशी संवाद साधला. आता अशावेळी नक्की कोण? कोणत्या बाजूने जाऊन? कुठे? काय करेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहेत. आता महाराष्ट्राचा सत्ता कारणात अडकलेला हा पेज नक्की सुटेल तरी कसा? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

Related Articles

Back to top button