⁠ 
रविवार, मे 19, 2024

दहावी-बारावी परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. दहावी-बारावी परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता महत्वाची बातमी आहे. या परीक्षेत अपयश आलेल्यांसाठी पुरवणी परीक्षांच्या (Supplementary Exams 2022) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीचा पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे

जे विद्यार्थी दहावीच्या किंवा बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले किंवा अपयशी ठरले अशा विद्यार्थ्यांना खचून जाण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना अजून एक चान्स मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा (Time table of Supplementary Exams 2022) ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कधी आहे पुरवणी परीक्षा
बारावीचा पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे.या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.