दर्जी फौंडेशन तर्फे अण्णाभाऊसाठे जयंती साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१। दर्जी फाऊंडेशनतर्फे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त दर्जी फाऊंडेशन जळगांव परिवारातर्फे दोघी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यात दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी आपले विचार मांडतांना म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.
तसेच लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये जागविलेले राष्ट्रप्रेम युवकांना घेण्याची आज काळाची गरज आहे. प्रत्येकाने कष्ट व कर्तृत्वाने श्रेष्ठ व्हा असे मनोगतात प्रा.गोपाल दर्जी म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भागवत सुरळकर तर आभार कोमल जैस्वाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दर्जी फाऊंडेशनच्या संचालिका सौ. ज्योती दर्जी, संतोष मर्दाने, उमेश पाटील, दगडू पाटील, दर्जी फाऊंडेशनचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.