---Advertisement---
जळगाव शहर शैक्षणिक

जळगावचा अंकित विजयसिंग पाटील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज (दि.२३) जाहीर झाला असून जळगाव येथील अंकित विजयसिंग पाटील ने देशपातळीवर (AIR) ७६२ वा रँक मिळविला आहे. त्याच्या यशाबद्दल शहरात सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे. जैन इरिगेशन कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर असलेले विजयसिंग आणि एम.जे. कॉलेजमधील प्राध्यापिका डॉ. संगीत पाटील यांचा तो मुलगा असून आयआयटी गोल्ड मेडलिस्ट तसेच आयआयटीबीआयटी या पुस्तिकेची लेखिका सुकन्या पाटील यांचा तो धाकटा भाऊ आहे. अंकित चे मुंबई आयआयटी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले असून सद्या IIT दिल्ली येथे मास्टर इन पब्लिक पॉलिसी चे शिक्षण घेत आहे. पाटील कुटुंबीय हडसन (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवासी आहे.

५ जून २०२२ रोजी लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल २२ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पात्र उमेदवारांची १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेचा निकाल ६ डिसेंबर रोजी जाहीर झाला होता. १८ मे २०२३ रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे तीनही टप्पे यशस्वीरीत्या पार करत अंकित पाटीलने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे अंकित पाटील व सर्व पाटील कुटुंबियांचे शहरवासियांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---