प्राणी गणना : यावल अभयारण्यात एकाही वाघाचे नाही झाले दर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । यावल अभयारण्यात प्राणी गणना करण्यात आली. यावेळी यावल अभयारण्यात एकही वाघ दिसून आला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून प्राणी गणना बंद होती. यंदा दोन वर्षांनी प्राणी गणना झाली यावेळी एकाही वाघाचे दर्शन झाले नाहीच
मात्र पाल, जामन्या वन क्षेत्रात बिबट्या वावर दिसून आला. तसेच गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत काही प्राण्यांचे वास्तव्य वाढलेले दिसून आले आहेत. यंदा वाघ न दिसल्याने वन क्षेत्राच्या सुरक्षेसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्राणी गणनेसाठी येथील शहरातील अनेक निसर्गप्रेमी वनक्षेत्रात गेले होते. सोमवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी यावल अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांची प्रगणना घेण्यात आली. त्यात प्राणी गणनेसाठी पाल वनक्षेत्रात १८ तर जामन्या वन क्षेत्रात १५ असे एकूण ३३ ठिकाणी मचाणी बांधण्यात आल्या होत्या. यावेळी रात्री चांगल्यापैकी वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. मात्र दोन वर्षांपूर्वी मचाणावर थांबलेल्या निसर्गप्रेमींना वाघाचे दर्शन झाले होते. यंदा दोन वर्षानंतर अभयारण्य वन्यजीव क्षेत्रात वाघाचे कुठेच अस्तित्व दिसून आले नाही.
वनक्षेत्रात आढळले एकूण २३३ वन्यप्राणी. गेल्या दोन वर्षापूर्वी १८ मे २०१९ ला जामन्या वनक्षेत्रात १९०, तर पाल वनक्षेत्रात १४४ असे एकूण ३३४ प्राणी आढळून आले होते. यंदा दोन वर्षानंतर जामन्या वनक्षेत्रात १६८ तर पाल वनक्षेत्रात १५४ असे एकूण ३२२ वन्य प्राणी आढळून आले.
पाल वनक्षेत्र..
बिबट १, अस्वल १ , कोल्हा २१ , ससा १५ , वानर २७ , मोर २० , रानडुक्कर ९ , लांडगा ५ , तडस ६ , रानमांजर ९ , भेकर २५ , चिंकारा १५ , निलगाय २, हरीण १, तसेच सर्प गरुड, साळीन्दर, उदमांजर
जामन्या वनक्षेत्र..
बिबट ० , अस्वल १०, कोल्हा १४ , ससा ९ , वानर २२ , मोर ३६, रानडुक्कर ५५ , डस ९, रानमांजर ५ , भेकर , उदमांजर २ , हरीण २ , तसेच लांडगा, चिंकारा, नीलगाय