⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

अरे जरा लाज वाटू द्या..! अन् अनिल चौधरींना झाला संताप अनावर

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२३ । यावल ग्रामीण भागातील आरोग्य व पाणी संदर्भात जनतेचे किती हाल आहेत? हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र ग्रामसेवकांच्या भोंगळ कारभारामुळे संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही..

यावल तालुक्यातील दुसखेडा व आजूबाजूच्या गावात पिण्याचा पाणी येत नसल्यामुळे गट विकास अधिकारी डॉ.मंजूश्री गायकवाड मॅडम यांची आज प्रहार प्रदेशाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिलभाऊ चौधरी यांनी सरपंच सह ग्रामस्थ सोबत भेट घेतली..

गावात 15 15 दिवस पाणी येत नाही सरपंच यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून ही ग्रामसेवक दाखल न घेतल्यामुळे गरिबांच्या हाल होत आहे ग्रामसेवकला वारंवार सांगून सुध्दा ग्रामसेवक याकडे कानडोळा करत आहे, तो साधा बघायला सुध्दा येत नाही, ग्रामसेवकला काही देणेघेणे नाही. फक्त फुकटाचा पगार पाहिजे त्याला.

बीडीओ मॅडम ला अनिल चौधरी यांची अशी मागणी आहे की ग्रामसेवकावर कारवाई करावी. 08 दिवसात करावी नाही झाली आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार करणार आहोत या वेळी सरपंच सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.