प्रहारचे अनिल चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा उद्या शुभारंभ!
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दि.५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली ता.यावल येथे होत आहे. जिथे श्रद्धा आणि सबुरीचा ध्यास घेतला जातो अशा साईचरणी विकासाचा प्रचार संकल्प सिद्ध होणार आहे. यावेळी परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अनिल चौधरी व पदाधिकारी रावेर-यावल मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.
श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली ता.यावल येथे प्रचार नारळ वाढवल्यावर ते न्हावी येथे ४ वाजता कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यावेळी यावल माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, तुकाराम बारी, हाजी हकीम शेठ, आलिम शेख, दिलीप कोळी, माजी नगरसेवक बिलाल शेख, संभाजी सोनवणे, विकास पाटील, गणेश बोरसे, योगेश निकम आदी उपस्थित राहणार असून यावेळी मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी ३ वाजता श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली ता.यावल येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रहारचे यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.