⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी उभे राहणार उपबाजार

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | शेतकरीहित केंद्रबिंदू मानून धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कपबशी निशाणी लक्षात ठेवून सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनलतर्फे बांभोरी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी आणि बाजार जवळ येण्यासाठी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाळधी येथे उपबाजार सुरू करण्यासाठी अभिवचन देत आहे. असे ते म्हणाले

अध्यक्षस्थानी खासदार उन्मेष पाटील होते. आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजपचे पी.सी.आबा पाटील, भाजप ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष संजय माळी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहरप्रमुख विलास महाजन, कनिय्या रायपूरकर, भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, प्रतापरा

व पाटील, उमेदवार सुनील पवार, प्रेमराज पाटील, ईश्वर पाटील, संजय पवार, जिजाबराव पाटील, संजय माळी, किरण पाटील, ज्ञानेश्वर माळी, एस. आर. पाटील, किशोर पाटील, अरविंद मराठे, सुदाम पाटील, कल्पिता पाटील, लताबाई पाटील, सुरेखा चौधरी या उमेदवारांची उपस्थिती होती.