⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | हवामान | पाऊस आला रे भो.. अंदमानमध्ये कोसळल्या मान्सूनच्या सरी, राज्यात लवकरच..

पाऊस आला रे भो.. अंदमानमध्ये कोसळल्या मान्सूनच्या सरी, राज्यात लवकरच..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । संपूर्ण देशवासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. येत्या१ तारखेला म्हणजेच १ जूनला तो भारताच्या उपखंडामध्ये दाखल होणार आहे.

पुढील ५ दिवस अंदमान व केरळमधील नजीकच्या शहरात मध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.हे तर केरळ सह दक्षिण भारतातील काही राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच बरोबर महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्हात पावसाची शक्यता आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह