जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । जामनेर शहरात राहणाऱ्या ६८ वर्षीय वृध्द मॉर्निंग वॉक करत असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी १६ मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव रोडवर घडली आहे.

वसंत दत्तात्रय सैतवाल (वय-६८) रा. प्रकाश नगर, जामनेर असे मृत वृध्दाचे नाव आहे. वसंत सैतवाल हे आपल्या परिवारासह जामनेर शहरातील प्रकाश नगरात वास्तव्याला होते. मंगळवारी १६ मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले. जळगाव रोडने घरी परतत येत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.








