भजेगल्लीत प्रौढाचा मृतदेह आढळला
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । शहरातील भजेगल्लीत मजुरी करणाऱ्या एका प्रौढाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. खाली काेसळून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. राम रामेश्वर बिऱ्हाडे (वय ३९, रा. विवेकानंदनगर) असे मृत प्रौढाचे नाव आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
बिऱ्हाडे हे मुळचे आसोदा गावातील रहिवासी आहेत. कामाच्या निमित्ताने ते जळगावात स्थायिक झाले. शुक्रवारी सकाळपासून ते कामाच्या निमित्ताने बाहेर पडले होते. रात्रभर घरी गेले नाहीत. दरम्यान, शनिवारी सकाळी ते निपचित अवस्थेत भजेगल्लीत पडून असल्याचे आढळले. एका घंटागाडी चालकाने त्यांची ओळख पटवून घरी माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. बिऱ्हाडे यांचा डावा हात व डाव्या बाजूच्या चेहऱ्यावर दुखापत दिसून आली. घातपाताचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी जनाबाई, मुलगा लोकेश व मुलगी जान्हवी असा परिवार आहे.
हे देखील वाचा :