⁠ 
सोमवार, मे 6, 2024

आमोदा-भुसावळ रस्त्याची दैना.. चालक हैराण!

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा आमोदा-भुसावळ रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेय, वाहन चालक हैराण झाले आहेत. त्यातच त्या खड्यांमध्ये डागडुजी करण्यासाठी डांबर न वापरता निकृष्ट दर्जाचा बारीक कच भरत असल्यामुळे त्यावरून जड वाहन गेल्यावर तो कच रस्त्याच्या कड्याला लागून आहे. परिणामी अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

तसेच पाऊस पडल्यावर त्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्यावर खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज वाहन चालकाला येत नसल्याने अपघात होत आहे तसेच सोबतच वाहनाचेही नुकसान होत आहे. भुसावळ ते रावेर शहराला जोडणारा व पुढे मध्यप्रदेश ला जोडणारा हा प्रमुख रस्ता असून यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. सोबतच हा संपूर्ण केळी पट्टा असून या रस्त्यावर नेहमीच मोठे वाहन सतत सुरू असतात.

यातून दोन चाकी व चार चाकी वाहन धारकांना खड्यातून मार्ग काढतांना जीव मेटाकुटीला येतो. भुसावळ हे रेल्वेचे माहेर घर असल्याने व भुसावळ येथून रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभरात हजारो रिक्षा, मिनिडोर प्रवाशांना घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांना या खड्यांचा त्रास सहन करावा लागतो. खड्यांमुळे पाठदुखी सारखे मणक्याचे आजार घडू लागले आहेत.

त्यातच डागडुजी करण्यासाठी वरच्यावर टाकलेला निकृष्ट दर्जाचा डांबर नसलेला बारीक कच हा रस्त्याच्या कड्याला लागल्यामुळे मध्ये खोल भाग निर्माण होऊन पाऊस पडल्यास पाण्याचा निचरा होत नाही. पाणी रस्त्यावर साचून राहते याचा फटका सामान्य नागरिकांना, वाहनचालकांना बसत असून अनेकांचे प्राण सुद्धा या रस्त्यावर गेले आहेत. गेल्या दिवसातच भुसावळ-सावदा या टप्यातील आमोदा- पाल या रस्त्याचे काम पूर्ण केले गेले, हा रस्ता भुसावळ पर्यंत पूर्ण करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.