---Advertisement---
जळगाव शहर जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

अमित ठाकरे दोन दिवस जळगाव जिल्ह्यात मांडणार ठाण !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे महा-संपर्क अभियाना अंतर्गत जळगाव जिल्हा दौरा करणार आहेत.

amit thakre jpg webp webp

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महासंपर्क अभियानाचा आठवा टप्पा उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. यात अमित ठाकरे हे धुळे, अहमदनगर, शिर्डी, शहादा, जळगाव व भुसावळ या ठिकाणी दौरा करणार आहेत.

---Advertisement---

18 जुलै रोजी अमित ठाकरे हे धुळे शहरात येणार असून 19 जुलै रोजी ते शहादा येथे येणार आहेत. त्यानंतर दोन दिवस ते जळगाव जिल्ह्यात येणार आहेत. म्हणजेच 20 जुलै गुरुवार आणि 21 जुलै शुक्रवार असे दोन दिवस ते जळगाव आणि भुसावळ या दोन शहरांमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

पुढे भुसावळ नंतर ते अहमदनगर आणि शिर्डी येथे जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महा-संपर्क अभियान सुरू आहे. यासाठी अमित ठाकरे संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. या अनुषंगाने ते आता जळगाव जिल्ह्यात सुद्धा येणार असून जळगाव शहरात व भुसावळ शहरात पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत.

या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तरुणांनी व स्थानिकांनी मनसे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---