⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | गुन्हे | चाळीसगाव तालुक्यात रुग्णवाहिकेला भीषण अपघात; एक ठार, तिघे जखमी

चाळीसगाव तालुक्यात रुग्णवाहिकेला भीषण अपघात; एक ठार, तिघे जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच चाळीसगाव तालुक्यातील रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य २ जण जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर हरी बच्छे (वय २७, रा. सायगाव बगळी ता. चाळीसगाव) असे अपघातातील तरुणाचे नाव असून याबाबत पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी येथील ज्ञानेश्वर हरी बच्छे हा युवक भजनी मंडळामध्ये वादक म्हणून कामाला होता. बच्छे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. ज्ञानेश्वर यांचा काही दिवस आधी दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात आले होते.सायगाव येथे घरी परतल्यावर त्यांना पुन्हा मुत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यासाठी त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे रुग्णवाहिकेने नेत असताना कळवाडी फाट्याजवळ एर्टिगा कारसह भीषण धडक झाली.

त्यात ज्ञानेश्वर बच्छे यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. बच्छे हे सायगाव परिसरातील भजनी मंडळात वादक म्हणून काम करत होते. काही दिवस आधी दुचाकी अपघातानंतर तातडीने बच्छे यांना नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. ते घरी परतले व काही दिवसातच त्यांना गुरुवारी रात्री मुत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी नाशिक येथे नेण्याचे ठरले. नातेवाइकांनी जवळच असलेल्या पिलखोड येथील रुग्णवाहिका बोलावली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.