⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेरात खाकीतील प्रामाणिकतेचा सन्मान

अमळनेरात खाकीतील प्रामाणिकतेचा सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । समाजाकडून व माध्यमातून पोलिसांवर नेहमीच टीकेची झोड उठत असते. परंतु कर्तव्य पार पाडत असताना बहुतांश कर्मचारी आपल्या कर्तुत्वाने व प्रामाणिकतेने आपले कर्तव्य सिद्ध करत असतात. अमळनेर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे व विनोद धनगर हे गस्तीवर असताना. एका दुकानासमोर सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चेक व इतर कागदपत्र आणि लायसन्स असलेले पिस्टल एका बॅगेत आढळून आले. या बाबत त्यांनी खातरजमा करून ती बॅग परत केली. पोलिसांचा प्रामाणिकपणा पाहून ‘त्या’ व्यापाऱ्याने येथील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या उपस्थितीत ‘त्या’ दोघी पोलिसांचा सत्कार केला व पोलीस प्रशासनाबद्दल भावना व्यक्त करून पुनश्च त्यांचे आभार मानले.

याबाबत सविस्तर असे की, येथील अंचिबा ज्वेलर्सचे मालक विनोद वर्मा हे बाहेरगावी गेले होते. ते रात्री १:०० वाजता बाहेरगावाहून घरी आले. गाडीतील सामान व बॅग उतरून त्यांनी दुकानाच्या ओट्यावर ठेवली व घाईघाईत शटर उघडून बाकी सामानासोबत ते घरात निघून गेले. दरम्यान, जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे आदेशावरून रात्रीची गस्त सक्तीने होणे कामी आर.एफ.आय.डी गार्ड मॉनिटरिंग सिस्टिम ही प्रणाली अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव व जयपाल हिरे पोलीस निरीक्षक अमळनेर यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली आहे.

त्यानुसार २४ रोजी पोलिस हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे व पो.ना.विनोद धनगर हे गस्तीवर असताना रात्री ३:४५ वाजता त्यांना सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चेक व इतर कागदपत्र आणि लायसन्स असलेले पिस्टल एका बॅगेत आढळून आले. यावरून त्यांनी त्या दुकानाचे मालक विनोद वर्मा यांचे दुकानाचे शटर ठोठावून त्यांना बाहेर बोलावले व चौकशी केली असता. मी रात्री १:०० वाजता बाहेरगावाहून आलो व घाईत सामान उचलून घरात निघून गेलो व बॅग बाहेरच विसरलो. असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा :


    author avatar
    टीम जळगाव लाईव्ह