15 हजारांची लाच भोवली ; अमळनेरातील पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

ऑक्टोबर 23, 2021 7:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । एका गुन्ह्याच्या प्रकरणात पोलीस तपासात मदत करण्यासाठी 15 हजारांची लाच मागणी करून लाच स्वीकारणार्‍या अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला. भास्कर चव्हाण असे लाच स्वीकारणार्‍या पोलीस नाईकचे नाव आहे.

lach jpg webp

भास्कर चव्हाण यास जळगाव एसीबीच्या पथकाने राहत्या घरी अटक केली. ही कारवाई शनिवार, 23 रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आल्याने पोलीस वर्तुळातमोठी खळबळ उडाली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now