जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । एका गुन्ह्याच्या प्रकरणात पोलीस तपासात मदत करण्यासाठी 15 हजारांची लाच मागणी करून लाच स्वीकारणार्या अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला. भास्कर चव्हाण असे लाच स्वीकारणार्या पोलीस नाईकचे नाव आहे.
भास्कर चव्हाण यास जळगाव एसीबीच्या पथकाने राहत्या घरी अटक केली. ही कारवाई शनिवार, 23 रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आल्याने पोलीस वर्तुळातमोठी खळबळ उडाली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.