स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदेने पटकावला प्रथम क्रमांक

जुलै 18, 2025 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । देशभरात शहरांमधील स्वच्छतेचा दर्जा राखण्यासाठी केंद्राकडून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येते. २०२४-२५ च्या स्वच्छ सर्वेक्षणात या स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेने साडेबारा हजार पैकी नऊ हजार तीन गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. गेल्यावर्षीही येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये जिल्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाच्या सर्वेक्षणात पालिकेने चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

swachha sarveshan

हे अभियान फक्त पालिका व शासकीय यंत्रणापुरतेच मर्यादित राहू नये, तर त्यात नागरिकांचाही सहभाग असावा यासाठी स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. यासाठी पालिकांना विविध घटक ठरवून देण्यात आले आहेत. पालिकांनी केलेल्या कामगिरीनुसार त्यांना स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक दिला जातो. येथील स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चा निकाल १७ जुलै रोजी जाहीर झाला. त्यात अमळनेर शहर जिल्ह्यात प्रथम, तर ५० हजार ते ३ लक्ष लोकसंख्या गटात -नाशिक विभागात चौथ्या स्थानावर, राज्यात १७ व्या स्थानावर तर स्वच्छ शहरांमधून येथील पालिकेस देशाच्या ५० हजार ते ३ लक्ष लोकसंख्या गटात ११० व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मिळविलेले गुण
स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत सर्टिफिकेशन, सव्र्व्हिस लेव्हल प्रोग्रेस घटक आहेत. सर्टिफिकेशन या घटकात हगणदारीमुक्त शहर व कचरामुक्त शहर मानांकनावर गुण दिले जातात. यात येथील पालिकेला २५०० पैकी हागणदारीमुक्त शहर मानांकनात एक हजार गुण मिळाले आहेत. सिटिझन व्हॉइस प्रकारात पालिकेने केलेली जनजागृती, प्रतिक्रिया आदींचा समावेश असतो. तर सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसमध्ये एकूण १० हजार गुणांसाठी स्वच्छता अभियानांतर्गत केलेल्या कामांच्या कागदपत्रांच्या व प्रत्यक्ष पाहणीचा समावेश असतो. त्यात पालिकेने १० हजार पैकी ८ हजार तीन गुण मिळवले. त्यामुळे यंदाच्या सर्वेक्षणाला पालिकेचे मानांकन सुधारले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now