⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | Pushpa 2 । अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चे बजेट 500 कोटी, ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

Pushpa 2 । अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चे बजेट 500 कोटी, ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. कोटीच्या कोटी उड्डाणे घेत सुपरहिट ठरलेल्या पुष्पाला निर्मात्यांच्या अपेक्षेपेक्षा देखील चांगले यश मिळाले होते. चित्रपटातील गाण्यांनी तर अनेकांची मने जिंकली होती. आजही पुष्पा चित्रपटाची गाणी ट्रेंडिंग आहेत. पहिल्या यशानंतर ‘पुष्पा द रुल’चा सिक्वेल काढण्यासाठी निर्माते तयारीला लागले असून चित्रपटाचे बजेट ५०० कोटीच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच चित्रपट निर्माते शंकर यांनी बिझनेस टुडेसोबत बोलताना चित्रपटाच्या रिलीजची तारीख देखील जाहीर केली आहे.

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा चित्रपटाला केवळ देशभरातच नव्हे तर जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. तेलगू चित्रपटसृष्टीतील या शानदार चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक प्रेम पुष्पा चित्रपटाला मिळाले. ‘पुष्पा द रुल’चा सिक्वेल आणखी दमदार करण्यासाठी निर्माते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, अभिनेता विजय सेतुपती ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये अल्लू अर्जुनसोबत कहाड फाजील आणि रश्मिका मंदान्ना देखील राहणार आहेत.

‘पुष्पा पार्ट 2’ अधिक दमदार करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. चित्रपटाचे सीक्वेन्स आणि महत्वाचे स्टंट्स आखणे सुरू आहे. चित्रपट खास बनवण्यासाठी बजेटचा मोठा खर्च होणार आहे. आता निर्मात्यांनी ‘पुष्पाच्या बजेटबाबत काही अपडेट शेअर केले आहेत. अल्लू अर्जुनच्या या दमदार सीक्वलचे बजेट 350 कोटी रुपये असणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये समोर आले होते. पण आता या चित्रपटाचे एक निर्माते वाय. शंकर यांनी ‘पुष्पा 2’चे बजेट यापेक्षाही अधिक असणार असे सांगितले आहे. शंकर यांनी बिझनेस टुडेसोबत संवाद साधला.

शंकर म्हणाले कि, उत्तर भारतात चित्रपटाचे प्रमोशन करू शकलो नसल्याबद्दल मला अजूनही खंत आहे. दक्षिण भारताबाहेर चित्रपटाच्या यशाने आम्ही नक्कीच आश्चर्यचकित झालो, आम्हाला माहित नव्हते की तो इतका मोठा असेल कारण आम्ही प्रमोशनवर जास्त वेळ दिला नाही. ’पुष्पा 2’साठी 500 कोटी रुपयांची गरज असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

बिझनेस टुडेच्या मुलाखतीत निर्मात्यांनी असेही संकेत दिले आहेत की, ‘पुष्पा 2’ च्या प्रमोशनचे बजेट 5 पटीने वाढू शकते आणि 500 कोटी रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. यावेळी त्यांना देशाच्या प्रत्येक भागात जवळपास दोन महिने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करायचे आहे. शंकर पुढे बोलताना म्हणाले की, ऑगस्ट 2023 पर्यंत चित्रपट प्रदर्शित करायचा आहे. आधीच्या वृत्तानुसार, हा चित्रपट डिसेंबर 2022 पर्यंत प्रदर्शित होणार होता. शंकर यांच्या मुलाखतीनंतर चित्रपटाचा नेमका महिना समोर आला आहे. पुष्पा आणि अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना किमान एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.