एकलव्य क्रीडा संकुलातील आकांक्षा करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । एकलव्य क्रीडा संकुल येथील एकलव्य जलतरण अकॅडमीची  विद्यार्थिनी खेळाडू कु. आकांक्षा गोरख म्हेत्रे हिची सायकलींग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे गुवाहाटी आसाम येथे १० ते १५ डिसेंबर २०२२ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय ट्रेक सायकलिंग स्पर्धेत (युथ मुली) टाईम ट्रायल, वैयक्तिक प्रकारात निवड झालेली आहे.

बेलोट्रॉम, बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत क्वालिफाय वेळेत आकांक्षाने राज्यस्तरीय संघात स्थान मिळविले आहे. तिच्या या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी अभिनंदन केले आहे.