मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

फेब्रुवारी 10, 2026 3:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५’ या राज्यस्तरीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थिनी कु. आकांक्षा डोंगरे हिची मिस कॅटगरीमध्ये फायनलिस्ट म्हणून निवड झाली आहे.

Akanksha Dongre

कु. आकांक्षा डोंगरे सध्या बी.एससी. नर्सिंग (सातवा सेमिस्टर) मध्ये शिक्षण घेत असून, अभ्यासासोबतच तिने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली. शारीरिक तंदुरुस्ती, फिटनेस, व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिने नियमित सराव करत जिमचे प्रशिक्षण घेतले. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर तिने राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Advertisements

या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कु. आकांक्षा डोंगरे हिचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कु. आकांक्षा डोंगरेच्या या यशामुळे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या नावलौकिकात भर पडली असून, महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now