जळगाव शहरमहाराष्ट्रराजकारण
गिरीश महाजनांना ‘युनाइटेड नेशन’मध्ये भाजप वाढवायला पाठवायचय – अजित पवार
जळगाव लाईव्ह न्युज । २६ डिसेंबर २०२२ । गिरीश महाजन यांचे कॉन्टॅक्ट खूप आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यामुळे मुख्यमंत्री पदाचा माहीत नाही मात्र त्यांना युनायटेड नेशन्स मध्ये नक्की भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी देण्यात येईल असा खोचक टोला अजित पवार यांनी विधासभेत हणाला.
उत्तर महाराष्ट्राला आजवर कधीही मुख्यमंत्री पद मिळालं नाही अशी खदखद विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडली. बोलत असताना त्यांनी विदर्भाचा उल्लेख करताना विदर्भाला इतकी पद मिळाली तरी देखील विदर्भाचा विकास झाला नाही असा खोचक टोलाही लगावला. यामुळे इथल्या लोकांनी एकत्र येऊन आता विदर्भाचा विकास करायला हवं असं अजितदादा पवार म्हणाले.