जळगाव जिल्हा

जळगावात लखपती दिदीसंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा ; वाचा काय आहेत..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२४ । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी जळगावात लखपती दिदी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून यादरम्यान संबंधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली. आपण महाराष्ट्रात ५० लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प करूया. महिलांवर जबाबदारी टाकली तर महिला जबाबदारी यशस्वी पेलू शकतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.असं ते म्हणाले आहे.

आजच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान यांचे स्वागत करताना मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं स्वागत केलेले पहिल्यांदाच पाहत आहे अशा शब्दात अजितदादा पवार यांनी पंतप्रधान यांचे स्वागत केले.

अजितदादा पवार पुढे म्हणाले की असे वातावरण मी पहिल्यांदाच पाहत आहे.आज परिस्थिती वेगळी आहे. नैसर्गिक परिस्थिती चांगली नाही.सगळीकडे पाऊस सुरू आहे. तरीही गावातील महिला येथे आलेल्या आहेत. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं मोदींचं उद्दिष्टं आहे. आपण महाराष्ट्रात ५० लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प करूया. महिलांवर जबाबदारी टाकली तर महिला जबाबदारी यशस्वी पेलू शकतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.

त्याच दिशेने आपण प्रवास करूया असेही पवार यांनी सांगितले. जळगावातील कानकोपऱ्यातून प्रत्येक तालुक्यातून महिला पंतप्रधानांना भेटायला आल्या. तुमचा उत्साह पाहून तुम्हाला सलाम केला पाहिजे. राज्याने महिलांना मान दिला आहे. सन्मान दिला आहे. सक्षम केलं आहे. महिला सक्षम होत आहेत. आपणही काही योजना आणल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button