---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

राजकीय महाभूकंप : अजित पवार, भुजबळसह या 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप केला आहे.

अजित पवार jpg webp webp

शरद पवारांच्या पक्षाचे जवळपास ४० आमदार त्यांनी फोडले असून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्री झाले आहेत. यात अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील.

---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले.यानंतर राजभवनात शपथविधी पार पडला. राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ३० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अजित पवार यांची सकाळपासून आपल्या समर्थक आमदारांसोबत बैठक सुरू होती. यामध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---