ऐनपूरला पटेल विद्यामंदिरात बक्षिस वितरण समारंभ संपन्न!

ऑक्टोबर 3, 2022 5:33 PM

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदीरात सहशालेय उपक्रमांचा बक्षिस वितरण समारंभ संस्थाध्यक्ष भागवत पाटील यांचे अध्यक्षतेत संपन्न झाला. यावेळी रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेत व गोपाळकाला, गणेशोत्सव, तसेच विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून संस्थाचालकांनी तसेच गावातील लोकांनी विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय जीवनात उपयोगी येईल असे साहित्य वितरण करण्यात आले.

jalgaon 2022 10 03T173133.067

प्रास्ताविक मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी तर स्वागत शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून बलवाडी येथील सेवानिवृत्त उपशिक्षक येवले उपस्थित होते. येवले व संचालक एन.व्ही.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आरती पाटील यांनी केले. आभार कल्याणी शिंदे यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील, चेअरमन श्रीराम पाटील,सचिव संजय पाटील,उपाध्यक्ष रामदास महाजन,संचालक जगन्नाथ पाटील,हरी पाटील,डॉ.सतीश पाटील,विकास महाजन, कैलास पाटील,विजय पाटील,पी.एम.पाटील,प्रविण महाजन,सुदेश पाटील,एन.व्ही.पाटील,प्रकाश चौधरी,सहसचिव आर.एस.पाटील व प्रमुख अतिथी बलवाडी येथून आलेले सेवानिवृत्त शिक्षक येवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now