शेती अवजारे बँक : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीची अवजारे मोफत
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । भरारी फाउंडेशन जिल्हा प्रशासन कृषी विभाग जळगाव व उभारी प्रकल्पा अंतर्गत शेतकरी संवेदना अभियानाच्या माध्यमातून ‘शेती अवजारे बँकेचा’ शुभारंभ शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत झाला. या बँकेच्या माध्यमातून अल्पभूधारक गरजू शेतकऱ्यांना शेतीची अवजारे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अल्पबचत भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाभरातील १०० गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना यावेळी मोफत बियाणे वाटप करण्यात आले. भरारी फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून शेतकरी संवेदना अभियान राबवित असून याअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात व कर्जबाजारी, अल्पभूधारक शेतकऱ्यांना उभारी देण्याकरीता विविध माध्यमातून मदतीचा हात दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ” शेती अवजारे बँक ‘ यामध्ये नवीन ट्रॅक्टर टिलर नांगर रोटावेटर अशा दहा लाख रुपयांच्या औजार बँकेचे सामुग्रीचे अनावरण मान्यवरांच्या हातून करण्यात आले.
आत्महत्याग्रस्त कुटुंब असेल जे शेतकरी अल्पभूधारक गरीब व कोरडवाहू शेती करणारे शेतकरी आहेत किवा ज्यांच्याकडे नांगर, टिलर, रोटावेटर, करण्यासाठी पैसे नाहीत अशा शेतकऱयांना ही औजार बँक मोफत उपलब्ध करून दिली जाईल. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे व शेतकरी सक्षम झाला पाहीजे म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे दीपक परदेशी यांनी सांगितले. शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे शेतकऱ्याने नवनवीन पद्धतीचा वापर करून प्रगती केली पाहिजे व संपूर्ण प्रशासन शेतकऱयांच्या पाठीशी आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले भालचंद्र पाटील, यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यानं बद्दल संवेदना जागवल्या व शेतकऱयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
रजनीकांत कोठारी यांनी पुढील वर्षी नवीन ट्रॅक्टर घेऊन देण्याचे आश्वासन दिले व त्याचवेळी शंभर शेतकऱ्यांना मका ज्वारी तूर बाजरी व सोयाबीनचे बियाणे देण्यात आले त्यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जळगाव पीपल्स बॅंकेचे माजी अध्यक्ष व वेगा केमिकलचे संचालक भालचंद्र दादा पाटील, के. के. कॅन्सचे संचालक रजनीकांतकाका कोठारी, सनशाइन ऍग्रोचे संचालक राजेशभाऊ चौधरी, श्रीराम ऍग्रोचे श्रीराम पाटील, स्पार्क इरिगेशनचे रवींद्रजी लढ्ढा, तनिष्क शोरूमचे कुशल गांधी,लक्ष्मी ऍग्रोचे बाळासाहेब सुर्यवंशी,सोयो उदयोग समूहाचे किशोरभाऊ ढाके, उदयोजक अनिशभाई शहा, पारसभाई राका, स्वरूप लुंकड, सपन झुंनझुंनवाला, लखीचंदजी जैन,चंदन अत्तरदे, अशोक चौधरी ,पवन जैन, अजिंक्य देसाई, हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
पद्मालय फार्मर प्रोड्युसर कंपनी, एकचक्र शेतकरी उत्पादक कंपनी ,हायटेक बियाणे उत्पादक कंपनी ,राहुल पाटील, दीपक परदेशी, मोहित पाटील, सचिन महाजन, रितेश लिमडा, दीपक विधाते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.