जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । गेल्या दोन वर्षांपासून जगात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे जगाची झोप उडाली असता त्यात आता कोरोनाचा आणखी एक नवीन प्रकार सापडला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचे मिश्रण असल्याचे सांगितले जात आहे. त्याला डेल्टाक्रॉन असे नाव देण्यात आले आहे.
सायप्रस विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी आणि मॉलिक्यूलर व्हायरोलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लियोनडिओस कोस्त्रिकिस म्हणाले की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये म्यूटेशनची फ्रीक्वेंसी जास्त होती, हे नवे व्हेरिएंट आणि रुग्णालयात दाखल होण्याचे संबंध दर्शवितात.
हा नवीन प्रकार किती धोकादायक?
या नवीन व्हेरिएंटची जेनेटिक पार्श्वभूमी डेल्टासारखीच आहे, यावरही त्यांनी भर दिला. यासोबतच या व्हेरिएंटमध्ये ओमिक्रॉनचे काही म्यूटेशनही आढळले आहेत. सायप्रसचे आरोग्य मंत्री मिखालिस हदीपेंटेलस म्हणाले की, सध्या नव्या व्हेरिएंटबाबत काळजी करण्याची गरज नाही.
डेल्टाक्रॉनवर काम करणाऱ्या काही विषाणूशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, कोरोनाचा हा काही नवीन व्हेरिएंट नाही, हा व्हेरिएंट फाइयलोजेनेटिक ट्रीवर ट्रेस किंवा प्लॉट केला जाऊ शकत नाही.
देशात १.७९ लाखांहून अधिक रुग्ण आढळले
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या दैनंदिन प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 चे 1,79,723 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 146 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता देशातील संक्रमित रुग्णांची संख्या 7,23,619 वर पोहोचली आहे. तथापि, देशात अजूनही कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराची 4033 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?