---Advertisement---
गुन्हे भडगाव

१२४ क्विंटल मका खरेदी करून आडत्या पलटला, शेतकऱ्यांनी थेट गुन्हाच नोंदविला!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील शेतकरी अरुण बारकू पाटील (वय ६५) यांच्याकडुन आडत्याने १२४ क्विंटल मका खरेदी करून फसवणूक केली. या प्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

bhadagaon crime

शेतकरी अरुण बारकू पाटील यांनी भडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी योगेश सोनजे रा. खोलगली भडगाव याने पाटीलकडे १२४ क्विंटल मका खरेदी केला. व १० दिवसात पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र, संशयित आरोपीने १० दिवस उलटूनही शेतकरी अरुण बारकू पाटील यांना पैसे न दिल्याने पाटील यांनी फसवणूक केल्याप्रकरणी भडगाव पोलिसांत फिर्याद दाखल नेली.

---Advertisement---

पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी भेट दिली. त्यानुसार संशयित आरोपी योगेश सोनजे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चंद्रसेन पालकर करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---