---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

रस्त्यावरील तुटलेल्या वायरला स्पर्श झाल्याने प्रौढाचा मृत्यू ; चोपडा तालुक्यातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात पावसासह काही काळ झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर विद्युत तार तुटून पडली. या तुटलेल्या वायरला स्पर्श झाल्याने एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे घडली आहे. लतीफ इकबाल तडवी (वय ५५) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

tar

चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील लतीफ इकबाल तडवी हे पत्नी, २ मुले व २ मुली यांच्यासह वास्तव्यास होते. गावात मिळेल ते मोलमजुरीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान पाऊस सुरु असल्याने ते घरीच होते. तर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते शौचास जात असताना रस्त्यात पडलेल्या वायरचा त्यांचा स्पर्श झाला. यात त्यांना विजेचा जोरदार झटका बसून दूर फेकले गेले.

---Advertisement---

घडलेला प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर लतीफ तडवी यांना लागलीच जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. परिवारातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांना धक्का बसला असून मृत्यूची बातमी एकटाच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---