धरणगाव

दुचाकी अपघातात जखमी प्रौढाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जखमीचा मृत्यू झाल्याने, धरणगाव पोलिस स्थानकात दुचाकी चालकाविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल झाला.

७ एप्रिलला दुपारी धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील पोखरी फाट्याजवळ, दुचाकी (क्रमांक-जी.जे.०५-एम.डी.३७८८) वरील चालकाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून, समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक-एम.एच. १९ बी.के. ५१४३) धडक दिली. या अपघातात धनराज पंढरीनाथ नन्नवरे (वय ४२, रा. बांभोरी प्र.चा.ता. धरणगाव) यांचा मृत्यू झाला. तर नवल पंडित नन्नवरे (रा.बांभोरी) हे जखमी झाले होते.

Related Articles

Back to top button