⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कुमारवयीनांना लसीसाठी चार दिवस वेटिंग

कुमारवयीनांना लसीसाठी चार दिवस वेटिंग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । कोरोना ची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी ओमायक्रोन नावाच्या नवीन विषाणूने डोकं वर काढत तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहे. कोरोना पासून वाचण्यासाठी प्रत्येकाने कोरोनाप्रतिबंधक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात १५ ते १८ वयाेगटासाठीचे लसीकरण देखील सुरू झाले असून गुरुवारपासून ही माेहीम ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात १५ ते १८ वयाेगटासाठीचे लसीकरण सुरू हाेऊन दहा दिवस झाले आहेत; परंतु लसीअभावी गुरुवारपासून ही माेहीम ठप्प झाली आहे. किमान येणाऱ्या चार दिवस लस उपलब्ध हाेणार नसल्याने लाभार्थींना वाट पाहावी लागेल.
जिल्ह्यात ३ जानेवारी राेजी १५ ते १८ या वयाेगटातील लाभार्थींसाठी विशेष लसीकरण माेहीम सुरू झाली. जिल्ह्यात सुमारे २ लाख २५ हजार लाभार्थी लस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यासाठी केवळ ५० हजार लसींचा साठा जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे हाेता. त्यात २० हजारांची वाढ झाली. जिल्ह्यात सर्वत्र वाटप केलेल्या काेव्हॅक्सिन लसीचा साठा गुरुवारपासून संपुष्टात आल्याने दाेन दिवसांपासून या वयाेगटाचे लसीकरण बंद झाले आहे.

तसेच खास लस घेण्यासाठी पुणे येथील राज्य वितरण केंद्राकडे गेलेली गाडी रिकाम्या हाती परत आली. तसेच आगामी किमान तीन दिवस लस येणार नसल्याचे राज्य यंत्रणेकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात किमान बुधवारनंतरच या वयाेगटाचे लसीकरण सुरू हाईल. जळगाव शहरात महापालिकेने शहरात या वयाेगटासाठी १६ केंद्र कार्यान्वित केले हाेते. त्यासाेबत विविध सामाजिक संस्थांसाेबत महाविद्यालयात लसीकरण शिबिर लावण्यात येत हाेते; परंतु गुरुवारी अवघ्या तीन केंद्रांवर लस टाेचली गेली. तर शुक्रवारी सर्वच केंद्र बंद ठेवण्यात आले.

हे देखील वाचा:

author avatar
टीम जळगाव लाईव्ह