जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्राकडे तोकते या चक्रीवादळामुळे संकट निर्माण झाले आहे. जळगावातही त्यामुळे पाऊस सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिरिक्त 125 केव्हीचे जनरेटर तैनात करण्यात आले आहे. संध्याकाळी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णालयातील वीज नियंत्रण विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्राकडे चक्री वादळ घोंगावत असून त्यामुळे संकट निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून जळगावात देखील पाऊस सुरू झालेला आहे. शहरातील महत्त्वाचे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमध्ये संभाव्य वीज संकट तसेच वीज तारा तुटणे आदि संकट पाहता प्रभावी उपाययोजना करण्यात आले आहेत. चक्रीवादळाचा धोका पाहता अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) यांच्याशी शनिवारी १५ मे रोजी पत्र लिहून जनरेटर उपलब्ध करून देण्याविषयी मागणी केली होती. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने १२५ के व्ही शक्तीचे जनरेटर उपलब्ध झाले आहे. यामुळे मुख्य इमारतीला जर वीज गेली तर तातडीने वीज पुरवठा केला जाणार आहे. तसेच सी 2 या वॉर्डांमध्ये स्वतंत्र असे जनरेटर कार्यरत असून ते स्वयंचलित पद्धतीने कार्यरत आहेत. रविवारी संध्याकाळी १६ मे रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी इलेक्ट्रॉनिक विभागाचे मधुकर भावसार यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वीज उपलब्धता व संभाव्य वीज संकटाचा आढावा घेतला.
यावेळी मधुकर भालेराव यांनी, केलेल्या उपाययोजना व संकट कसे टाळता येईल याबाबतची सविस्तर माहिती दिली. प्रसंगी उप अधिष्ठाता डॉ मारुती पोटे, वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विजय गायकवाड, डॉ. सतीश सुरळकर आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.