⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | आदिवासी कोळी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन ; पहा काय आहे मागण्या..

आदिवासी कोळी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन ; पहा काय आहे मागण्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १० ऑक्टोबर २०२३ | आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आजपासून अन्नत्याग आंदोलन हे करण्यात आले आहे. यावेळी आदिवासी बांधवातर्फे विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. यात खालील मागण्यांचा समावेश आहे.

१) विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी चे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत.
२) ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे.
३) जातपडताळणी समिती जळगाव जिल्हा करिता मंजूर आहे परंतु कार्यालय धुळे येथे आहे. कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे
४) आदिवासी कोळी समाजाच्या, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र महर्षि वाल्मीक ऋषी यांचे नावे महामंडळ स्थापन करावे.
५) अप्पर जिल्हाअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती असावी.
६) तथाकथित आदिवासी संघटनांचा हस्तक्षेप थांबवावा.
७) बाहेरिल राज्यातील रहिवास्यांच्या जात वैधता रद्द कराव्यात.
८) टि एस पी क्षेत्रातील कोळी नोंदी प्रमाणे आम्हाला लाभ मिळावा.
९) आदिवासी कल्याण समितीतील आमदारांचा हस्तक्षेप थांबवावा.
१०) वादग्रस्त गोविंद गारे यांनी काढलेले अवैध परिपत्रक व शासन निर्णय रद्द करावा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.