⁠ 
रविवार, मे 19, 2024

आता फुल अन् फायनल: ‘तारक मेहता..’ मध्ये दयाबेनच्या भूमिकेत ‘या’ अभिनेत्रीची होणार एंट्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । ‘तारक मेहता का उल्टा चष्माला’ या शोने १४ वर्षे पूर्ण करत १५ व्या वर्षात पर्दापण केलं आहे. मात्र या शोमध्ये दयाबेनची भूमिका करणाऱ्या दिशा वकानीला शो सोडून बरीच वर्षे उलटून गेली आहेत. तिच्या पुनरागमनाबद्दल अनेक बातम्या समोर आल्या. मात्र अद्यापही दयाबेन शोमध्ये परतली नाहीय. त्यामुळे प्रेक्षकही तिच्या वापसीची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण मालिकेत दयाबेनच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

‘तारक मेहता’ हा सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन शो ठरला आहे. शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या हृदयात खास बनली आहे. दयाबेनचे पात्र हे देखील यातील एक महत्त्वाचे पात्र आहे. त्याचबरोबर टीव्ही अभिनेत्री काजल पिसाळ ‘तारक मेहता’मध्ये नवीन दयाबेनच्या भूमिकेत एंट्री घेणार आहे. रिपोर्ट्सनुसार, दयाबेनच्या भूमिकेसाठी काजल पिसालला फायनल करण्यात आल्याचे समजतेय. मात्र अद्यापही यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. 

काजल पिसाळच्या आधीही अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती, मात्र अद्याप एकाही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्याचवेळी काजल पिसाळ ‘तारक मेहता’मध्ये दयाबेनची भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यावर अद्याप अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच प्रॉडक्शन हाऊसने काजल पिसाळच्या नावावर काहीही सांगितलेले नाही.

काजल पिसाळ ही एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. काजल बडा अच्छे लगते हैं, नागिन 5 आणि साथ निभया साथिया सारख्या शोमध्ये दिसली आहे. काजल पिसाल शेवटची फक्त तुम या मालिकेत दिसली होती. काही दिवसांपूर्वी या शोचे निर्माते असित मोदी यांनी तारक मेहता शो सुरूच राहणार असल्याचे सांगितले होते. नवीन लोक आले तरी आपण आनंदी असू आणि जुने आले तर आणखी आनंद होईल, असे म्हणाले होते.

काजल पुढील महिन्यापासून ‘तारक मेहता’चे शूटिंग सुरू करू शकते, असे बोलले जात आहे. दिशा वाकाणीने आपल्या अभिनयाने दयाबेनची व्यक्तिरेखा घरोघरी लोकप्रिय केली आहे. आता काजल पिसाळ प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत खरी उतरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.