बातम्या

Actress Suicide : व्हिडीओ चॅट करतानाच अभिनेत्रीने केली आत्महत्त्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । मल्याळम चित्रपटात काम केलेल्या साऊथ अभिनेत्री शेरीन सेलीन मॅथ्यू हिचे मंगळवारी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोचीमध्ये भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये शेरिनने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करताना ती एका व्यक्तीशी व्हिडीओ चॅट करीत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने पोलिसांना देखील याबाबत कळविले होते मात्र पोलीस पोहचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. शेरीन एक ट्रान्सजेंडर मॉडेल आणि अभिनेत्री होती.

केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी २६ वर्षीय ट्रान्सवुमन मॉडेल शेरीन सेलीन मॅथ्यू हि मंगळवारी तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. आत्महत्या करताना शेरीन ज्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅट करत होती, तिने शेरीनच्या हालचालीची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. मात्र, पोलिस अधिकारी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले तोपर्यंत शेरीनने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेरीनने काही मल्याळम चित्रपटात काम केले असून ती मॉडेलिंगमध्ये देखील सक्रिय होती.

स्थानिक पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, शेरीनच्या जवळच्या लोकांनी माहिती दिली असून ती सध्या डिप्रेशनने त्रस्त होती आणि गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. या घटनेसंदर्भात पोलीस शेरीनच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवत आहेत. तपास प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह कलामसेरी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येणार आहे. कोचीमध्ये गेल्या वर्षभरात ट्रान्सजेंडरने केलेल्या आत्महत्येची ही पाचवी घटना आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button