जळगाव जिल्हा

मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर एरंडोल नगर पालिकेची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । नगरपालिकेने एरंडोल शहरात माझी वसुंधरा अभियान 2.0 तसेच वृक्ष लागवड मोहीम 2021 नुसार शहराचे हरीत आच्छादन वाढावे व हवेची गुणवत्ता सुधारणेसाठी ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.मात्र काही घरमालक आपले खासगी गुरे वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी चरण्यासाठी बांधून ठेवतात.गुरे मालकांना नगर पालिका कर्मचाऱ्यांनी स्वतः घरी उचित समज देण्यात आली होती.मात्र समज दिल्या नंतर काहीही न ऐकता नियमितपणे गुरे / ढोरे खुल्या भुखंडामध्ये बांधून आपल्या कामाला निघून जायचे.अश्या एकूण दोन गुरे मालकांवर नगर पालिकेने प्रत्यक्ष कारवाई करून दंड ठोठावला आहे. दंड ठोठावल्या नंतर त्यांनी गुरे न.पा जागेत बांधणे बंद केले आहे.यापुढे जे नागरीक आपली गुरे ढोरे अश्या प्रकारे खुल्या भुखंडा मधे बांधतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.तसेच त्यांच्या कडून संपूर्ण नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल.
नगर पालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की प्रत्येक कुटुंबाने एक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन व संगोपन करावे.आपले गाव सुंदर व हरीत करण्यास हातभार लावावे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button