⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | गुन्हे | जळगावात बनावट दारूसाठा वाहतूकीवर कारवाई ; पावणे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगावात बनावट दारूसाठा वाहतूकीवर कारवाई ; पावणे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । चोपडा-अमळनेर रोडवर सापळा रचून वाहन क्रमांक एमएच -३० बीडी- ११०३ हे वाहन देशी विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना मिळून आले. सदर वाहनात बनावट देशी दारू टँगोपंच १८० मी. ली. क्षमतेच्या एकूण २५४४ बाटल्या (५३ बॉक्स), विदेशी दारू मॅंकडोवेल नं. १ विस्कीच्या १८० मी.ली. क्षमतेच्या एकूण २४० बाटल्या (५ बॉक्स) व विदेशी दारू इम्पेरिअल ब्लू विस्कीच्या १८० मी.ली. क्षमतेच्या एकूण-२४० बाटल्या (५ बॉक्स) अशा प्रकारचा बनावट मद्यसाठा मिळून आला आहे. असा अवैध बनावट मद्यसाठा व वाहन असा एकूण किमंत रुपये-५,७९,४८०/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव, संचालक पी.पी.सुर्वे(अं व द.), उषा वर्मा, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, डॉ.व्ही.टी. भूकन अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०६ ऑगस्ट,२०२४ रोजी के. एन. गायकवाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने सावखेडा शिवार ता. अमळनेर जि.जळगाव येथे कारवाई केली.

या वाहनासोबत मिळून आलेले इसम शुर्भम सुधाकर पाटील रा. अरूननगर चोपडा ता. चोपडा जि.जळगाव व कैलास देविदास वाघ रा. श्रीरामनगर-२ चोपडा ता. चोपडा जि. जळगाव, यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. सदर कारवाई बी. डी. बागले सहा.दु.नि, व बी. एन. पाटील जवान.ब. न. ०१., एम. डी. पाटील जवान नि-वाहन चालक ब.न.०२ यांनी सदरच्या कारवाईत सहकार्य केले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग के. एन. गायकवाड, हे व अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव डॉ.व्ही.टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. राज्य उत्पादन चाळीसगांव वि, जि. जळगांव असे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग के. एन. गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.