⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | विवेकानंद नगरात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

विवेकानंद नगरात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । येथील विवेकानंद नगरात सुरू असलेल्या जुगाराचा डाव सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने आज दि २६ रोजी उधळून लावला झालेल्या कारवाईत २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील विवेकानंद नगरात जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना सोमवारी २५ एप्रिल रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, पोलीस मुख्यालयातील पोका. आकाश शिंपी, आकाश माळी, रविंद्र सुरळकर, जीवन जाधव, राहूल पाटील, चंद्रकांत चिकटे, पोहेकॉ सुहास पाटील, पो.ना. रविंद्र मोतीराया, पोकॉ. निलेश पाटील यांच्या पथकाने छापा टाकून सदर कारवाई केली.

पोलीसांनी छापा टाकून राजु शावख तडवी (वय-35) रा. किनगाव ता. यावल, रामकृष्ण साहेबराव सपकाळे (वय-34) रा. कांचन नगर आसोदा रोड, जळगाव, रमेश श्रावण सोनवणे (वय-48) रा. बालाजी मंदीराचे मागे जळगाव, चेतन अनिल भालेराव (वय-23) रा. स्वामी विवेकानंद नगर जळगाव आणि कुणाल महेश कोळंबे (वय-22) रा. स्वामी विवेकानंद नगर जळगाव यांना जागेवर ताब्यात घेतले. या करवाईत ७ हजार ३२० रूपयांची रोकड, जुगाराचे साहित्य, १ लाख ९८ हजार ६०० रूपये किंमतीचे मोबाईल, रिक्षा आणि दुचाकी असा एकुण २ लाख ५ हजार ९२० रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

मुख्यालय कर्मचारी पो.कॉ. निलेश भगवान राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.