⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

बिग ब्रेकिंग ! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

जळगाव लाइव्ह न्यूज | ५ एप्रिल २०२१ | संपूर्ण महाराष्ट्र भरात गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरु आहे. कित्येकदा अल्टीमेतम देऊनही संपकरी आपल्या संपावर ठाम आहेत. यामुळे आत्ता परिवहन महामंडळ, मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोड वर आले आहेत. येत्या काही दिवसत या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अटळ आहे.

राज्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहात तर जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्याचा विलीनीकरण तसेच संसर्ग वा अन्य कारणामुळे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मदत किंवा संपसंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य सरकारने वेळोवेळी तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान न्यायालायात सुनावणी दरम्यान १५ दिवसाचा अवधी मागून घेतला आहे. त्यानुसार आज ५ एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी होणार असून काय निर्णय येतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमचा अंत पाहू नका अश्या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कर्मचाऱ्यांना इशारा नुकताच दिला होता यामुळे आत्ता पुढे अॅक्शन मोडवर येत उपमुख्यमंत्री नक्की काय नर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जळगाव विभागात वाहन चालक, वाहक, यांत्रिकी विभाग आणि प्रशासन असे सुमारे४ हजार ५०० च्यावर कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी सुमारे ११०० च्यावर कर्मचाऱ्यावर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबन, कारणे दाखवा नोटीस आदि कारवाया करण्यात आल्या आहेत.