जळगाव जिल्ह्यात आज पोलिसांनी अनेक ठिकाणी आखाजीनिमित्त रंगणारे जुगाराचे डाव उधळून लावले. आव्हाणे शिवारात सुरू असलेल्या जुगाराच्या डाववर सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईत सरपंच पतीसह १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तालुका पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार, आव्हाणे शिवारात भगवान नामदेव पाटील यांच्या मालकीचे शेत गट नं.१३५/१३६ मधील पत्री शेडचे खोलीत पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना पथकाने छापा टाकला. पथकाने १) भगवान नामदेव पाटील उर्फ पिंटू २) नामदेव गोपाल पाटील ३) सोपान धर्मराज पाटील ४) हिरालाल श्रीराम चौधरी ५) अशोक नारायण पाटील ६) विजय शामराव पाटील ७) संजय सुभाष पाटील ८) संजय शांताराम पाटील ९) रावसाहेब गोपाल चौधरी १०) अकाश लहु पाटील ११) शिवनाथ रधुनाथ चौधरी १२) यशवंत मंगल पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. कारवाईत पत्त्याचे कॅटसह, ११ मोबाईल ४ मोटार सायकल व रोख रक्कम ३ लाख ३६ हजार ५३० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.