⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

शेत शिवारातून मोबाईल चोरी करणारा आरोपी जेरबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी शेत शिवारातून मोबाईल जबरी चोरी करणारा आरोपीला अटक केली असून आरोपीने मोबाईल चोरी केल्याचे कबुल केले आहे.

रोहित ऊर्फ बुबा मधुकर लोंखडे वय १९ रा. भालोद ता. यावल असे अटक आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यात मोबाईल चोरीचे प्रकार वाढल्याने डॉ. प्रविण मुंडे पोलीस अधीक्षक, जळगाव व चंद्रकांत गवळी अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, डॉ. कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर उपविभाग, फैजपूर यांनी किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले. किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि.९ रोजी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी रोहित उर्फ बुबा मधुकर लोखंडे भालोद ता. यावल हा सदरचा मोबाईल विक्रीसाठी भालोद गावात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार अधिनस्त पोलीस अंमलदार सफी सुलुत शेख इब्राहिम पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोना नंदलाल दशरथ पाटील, मोना किरण धनगर पीना प्रमोद लाडवंजारी, पोना भगवान तुकाराम पाटील, चापोहेकॉ भारत पाटील यांचे पथक तयार करून रवाना केले.

दरम्यान, सदर आरोपी भालोद बस स्टैण्ड भागात मिळून आल्याने त्याचे अंग झडती घेतली असता त्याचे अंगझडती यावल पो.स्टे. गु. ३९३२०२२ भाषेत क.३९२.३४ या गुन्ह्यातील ७,०००/- रु. किमतीचे ०१ समसंग कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल मिळून आला असून तो मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदर मोबाईल यातील आरोपी रोहित ऊर्फ बुबा मधुकर खड़े वय १९ रा. भालोद ता. यावल याने नमुद गुन्हयांतील अट्रावल शिवारात गुन्हयांतील फिर्यादी शेतकरी यांचेकडून जबरीने हिसकावुन मोबाईल जबरी चोरी केल्याचे सागुन मोबाईल चोरी केल्याचे कबुल केले आहे. सदर मोबाईल जप्त करुन आरोपी रोहित ऊर्फ बुबा मधुकर लोंखडे वय १९ रा. भालोद ता. यावल यास पुढील तपास कामी यावल पोलीस स्टेशनच्या मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले आहे.