जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । शहरातील परिसरात असलेल्या रामेश्वर कॉलनीतील तुळजाई नगरात एका ४२ महिलेला जबरी मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. एमआयडीसी पोलिसांनी जलद गतीने तपासचक्रे फिरवीत अवघ्या काही तासात संशयिताला ताब्यात घेतले आहे.
तुळजाई नगरात राहणाऱ्या वंदना गोरख पाटील वय-४२ या भाजी विक्रेत्या महिलेचा गळा आवळून आणि चेहऱ्यावर काहीतरी वस्तूने मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत लागलीच तपासचक्रे फिरवून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने संशयीत सुरेश सुकलाल माळी (महाजन) याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, संशयितांची कसून चौकशी करण्यात येत असून महिलेचा खून कशासाठी झाला हे अद्याप समजून आलेले नाही.